Pune railway : पुणे रेल्वे विभागात सेफ्टी सेमिनार आणि कोचिंग डेपोची तपासणी

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागावर सेफ्टी सेमिनार घेण्यात आला तसेच कोचिंग डेपोची तपासणी काल शनिवारी करण्यात आली. (Pune railway) लोकांना चांगला आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत प्रयत्नशील असते. यासाठी वेळोवेळी नियमित बारीक तपासणी आणि सेफ्टी सेमिनारचे आयोजन केले जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत जागरुक होण्यासही मदत होते, तसेच त्यांना नियमांचे अद्ययावतीकरण करता येते.

या भागात, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजय कुमार दडस आणि विभागीय सुरक्षा अधिकारी देवेंद्र कुमार यांनी घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्समधील कोचिंग डेपोमधील डब्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि संबंधित व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली.( Pune railway) कर्मचाऱ्यांशी संवादही प्रस्थापित केला. सिंह यांनी दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेऊन योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील विभागीय प्रशिक्षण केंद्रात कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या एक दिवसीय सुरक्षा सेमिनारचे उद्घाटन केले ज्यामध्ये पर्यवेक्षक, क्षेत्रीय कर्मचारी, स्टेशन कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Sahara Old age home : सहारा वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी दिशा सोशल फाउंडेशन कडून मदतीचा हात…

सुरक्षा विभागातर्फे आयोजित या चर्चासत्रात वाहनांचे संचालन व देखभाल, कामकाजादरम्यान घ्यावयाची काळजी,किरकोळ तांत्रिक त्रुटी यासह महत्त्वाच्या गोष्टींवर (Pune railway) सविस्तर चर्चा करून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विभागीय सुरक्षा अधिकारी देवेंद्र कुमार, सहायक संचालन व्यवस्थापक राघव राव उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.