Chhath puja : पिंपरी-चिंचवड शहरात पारंपारिक पद्धतीने छटपूजा साजरी

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध नदी घाटावर मावळत्या सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करून छटपूजा  उत्साहात साजरी करण्यात आली. (Chhath puja) पारंपारिक पद्धतीने सूर्यदेवतेची आराधना करण्यात आली.यावेळी विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत होती.

उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व इतर राज्यातील सर्वात मोठा उत्सव  छठपूजा आहे. छठी मैया, देवी प्रकृतीचे सहावे रूप आणि भगवान सूर्याची बहीण ही उत्सवाची देवी म्हणून पूजली जाते. हिंदू कॅलेंडर विक्रम संवत मधील कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) च्या चंद्र महिन्याच्या सहाव्या दिवशी, दीपावलीच्या सहा दिवसांनंतर साजरा केला जातो.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मूळचे उत्तर भारतातील रहिवासी गेल्या 20 ते 30 वर्षात स्थायिक झाले आहेत. हजारोंच्या संख्येने मूळचे उत्तर भारतातील रहिवासी शहरातील पवना इंद्रायणी व मुळा नदीकाठच्या घाटांवरती आज दुपारपासून छठ पूजा निमित्त सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करण्यासाठी जमत होते.(Chhath puja) नागरिक आपल्या घराजवळील नदी घाटांवर जमत होते. शहरातील 17 नदी घाटांवर छठ पूजा साजरी करण्यात आली आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच छटपूजेचा सण निर्बंधमुक्त साजरा करता आल्याने उत्तर भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

पिंपरी, काळेवाडी व राहटणी मधील नागरिक छठपूजा साजरी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पिंपरी येथील गणपती विसर्जन घाटावर दुपारपासून जमले होते. चिंचवड जवळील नागरिक तेथील गणपती विसर्जन घाटावर जमले होते.

 

Pune railway : पुणे रेल्वे विभागात सेफ्टी सेमिनार आणि कोचिंग डेपोची तपासणी

 

 

त्यांनी 4 ते 5 उसांना एकत्र बांधून मंडप तयार केला होता. त्याच्या सावलीत दिवे ठेवले होते व सूप किंवा टोपलीमध्ये विविध फळे ठेवुन पूजा करत होते. (Chhath puja) त्यानंतर  व्रत ठेवलेले महिलांनी सुपामध्ये फळे व दिवा ठेवून नदी जवळ गेल्या. त्यांनी मावळत्या सूर्याची पूजा केली.

काळेवाडी निवासी दिग्विजय सिंग त्यांच्या कुटुंबासमवेत छठ पूजा करण्यासाठी पिंपरीला आले होते. ते म्हणाले की आज सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करून छठ पूजा साजरी करण्यात आली आहे.

काळेवाडी निवासी महेंद्र यादव व त्यांच्या पत्नी सत्यभामा यादव म्हणाले की आज संध्याकाळी सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करण्यात आले आहे व ते उद्या पहाटे सूर्योदयापूर्वी परत येणार आहेत.(Chhath puja) ते उगवत्या सूर्याला नदीत उभे राहून सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करणार आहेत.

पिंपरी मधील नेहरूनगर येथील रहिवासी जितेंद्र चव्हाण म्हणाले की त्यांच्या पत्नीने काल रात्री 12 वा पासून उपवास धरला आहे व त्या उद्या उगवत्या सूर्याला अर्ध्य अर्पण केल्यानंतर सूर्योदय झाल्यावर उपवास सोडणार आहे.

इंद्रायणी घाटावरती छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी

आळंदी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील हजारो उत्तर भारतीय आणि बिहारी बांधवांनी रविवारी सायंकाळी  इंद्रायणी घाटावरती छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली.(Chhath puja) छठ पूजेसाठी उत्तर भारतीय महिला व्रत पाळतात. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उत्तर भारतीय महिला समर्पण भावनेने सूर्य देवतेची उपासना करीत छटपुजेचे व्रत मनोभावे करतात.या निमित्ताने हिवाळ्यात थंड पाण्यात उभे राहून सूर्य आणि छठी मैया या देवतेची पूर्ण भक्तिभावाने पूजा महिला करत असतात.

मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यापूर्वी पूजेसाठी बांबूची टोपली, बाबूंचे सूप हे फळे, ऊस, फुले आणि पूजेशी संबंधित इतर वस्तूंनी सजवली गेली. (Chhath puja) छठ पूजेच्या निमित्ताने इंद्रायणी घाटावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत होती.  यावेळी सायंकाळी उत्तर भारतीय आणि बिहारी बांधव इंद्रायणी घाटावर मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करताना दिसत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.