Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळला, 141 मृत.

एमपीसी न्यूज : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.  (Morbi Cable Bridge Collapses) या अपघातात आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह मोरबीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत. मृतांमध्ये 50 हून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर 100 जणांचा शोध अजूनही सुरू आहे.

मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

Chhath puja : पिंपरी-चिंचवड शहरात पारंपारिक पद्धतीने छटपूजा साजरी

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते. (Gujarat Bridge Collapses) यावेळी पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुड्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  काही दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती केली होती. गुजरातचे मंत्र्यांनी बचाव कार्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केवडियात आहेत. ते मोरबीलाही जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. आहे. सरकारने तात्काळ पावलं उचलत ५ सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात केली आहे. यामार्फत अपघाताच्या कारणाचा तपास करण्यात येणार आहे.

या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. (Morbi Cable Bridge Collapses) जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.