Sahara Old age home : सहारा वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी दिशा सोशल फाउंडेशन कडून मदतीचा हात…

एमपीसी न्यूज : सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळेपण जपणाऱ्या पिंपरी-चिंचवड येथील दिशा सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी (Sahara Old age home) आज ( रविवारी) मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमास भेट दिली. यावेळी शा सोशल फाउंडेशनकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला.

Vegetable prices : गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ ; टोमॅटोचे भाव घटले

निराधार आजी आजोबांसाठी असलेल्या या आश्रमाचे पक्के बांधकाम सुरू असून वीट व खडी घेण्यासाठी दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले यांनी 11 हजार रुपयांचा धनादेश आश्रमाचे अध्यक्ष विजय जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. (Sahara Old age home) संतोष निंबाळकर ,गोरख भालेकर, गुरुदास भोंडवे , संतोष बाबर,राजू कर्पे,नंदू कांबळे,आदी यावेळी उपस्थित होते. प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. तर गोरख भालेकर यांनी यावेळी व्यक्तिगत 10 पोती सिमेंट आश्रमास दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.