Vegetable prices : गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ ; टोमॅटोचे भाव घटले

एमपीसी न्यूज – गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी बाजारात गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ झाली. तर टोमॅटोचे भाव घटले आहेत.(Vegetable prices) अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, (Vegetable prices) गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, इंदौर येथून 2 टेम्पो गाजर, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, तामिळनाडू येथून शेवगा 2 टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची 7 ट्रक इतकी आवक झाली.

BJP Sammelan : तळेगाव दाभाडे येथे भाजपाचे बुद्धिजीवी संमेलन संपन्न

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1000 ते 1200 पोती, टोमॅटो आठ ते दहा हजार क्रेटस, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी  5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, (Vegetable prices) मटार 100 गोणी, गाजर 5 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ट्रक, आग्रा, इंदोर आणि पुणे विभागातून बटाटा 50 टेम्पो इतकी आवक झाली.

 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : 250-330, बटाटा : 220-300. लसूण : 150-500, आले सातारी : 200-450, भेंडी : 200-300, गवार : गावरान व सुरती : 300-500, टोमॅटो : 200-250, दोडका : 300-350, हिरवी मिरची : 300-4–, दुधी भोपळा : 200-250, चवळी : 200-300, कारली : हिरवी 250-300, पांढरी

:200-250, पापडी : 300-400, पडवळ : 200-250, काकडी : 200-250, फ्लॉवर : 120-160, कोबी : 200-250, वांगी : 250-400, डिंगरी : 200-250, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 400-500, तोंडली : कळी 400-450, जाड : 200-250, शेवगा : 1000-1200, गाजर : 300-400, वालवर : 400-500, बीट : 250-300, घेवडा : 300-450, कोहळा : 100-150, आर्वी:200-250, घोसावळे : 300-350, ढेमसे : 200-250, भुईमुग शेंग : 500-550, मटार : स्थानिक: 1400-1600, पावटा : 400-450, तांबडा भोपळा : 100-150, सुरण : 200-250, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600

 

कोथींबीर, करडई  भावात वाढ

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी मागील आठवड्याच्या तुलनेत कोथींबीर, करडईच्या भावात वाढ झाली. इतर भाज्यांचे भावा स्थिर आहेत. (Vegetable prices) दरम्यान कोथींबीरीच्या दोन लाख गड्ड्यांची आवक झाली तर मेथीच्या 60 हजार गड्ड्यांची आवक झाली. कोथींबीर 10 रुपये तर करडईच्या भावात दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : 1000-2500, मेथी : 1200-1300, शेपू : 600-800, कांदापात : 600-1600, चाकवत : 400-700, करडई : 500-700, पुदीना : 300-600, अंबाडी : 500-600, मुळे : 1000-1500, राजगिरा : 400-600, चुका : 800-1200, चवळई : 400-600, पालक : 1000-1500.

 

फळ बाजार

फळ बाजारात रविवारी (ता.30) लिंबाची सुमारे दिड हजार गोणी, डाळिंब 40 टन, पपई 15 टेम्पो, चिक्कू 600 बॉक्स, मोसंबी 70 टन, संत्रा 25 टन, पेरू सुमारे 20 टन कलिंगड 10 तर, खरबूज 2 पिकअप, सिताफळ 30 टन आवक झाली होती. तर बोरांचा हंगाम सुरू झाला असून, सोलापूर जिल्ह्यांमधुन विविध बोरांची सुमारे 20 ते 25 गोणी आवक झाली होती.

विविध फळांचे दर

लिंबे (गोणीस) – 300-600, डाळिंब (किलो) गणेश – 10-40, भगवा 50-200, आरक्ता 20-80, पपई प्रति किलो 12-15, पेरू (20 किलो) -200-500, सिताफळ – 15-70, कलिंगड 20-25 खरबूज 30-45, मोसंबी 3 डझन 220-350, 4 डझन 120-210. संत्रा (10 किलो) 200-500. बोरांची प्रति किलोचे दर चण्यामण्या – 100-130, चेकनट 90-100, चमेली 28-32, उमराण 15 ते 20

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.