Pune : कला क्षेत्रातील योगदानाबद्दल हेमा जैन यांचा रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव

एमपीसी न्यूज – कला क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी स्कूल ऑफ आर्टच्या प्राचार्य हेमा जैन यांचा
सत्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

पुणे कॅम्प येथे अलीकडेच पार पडलेल्या या सत्कार प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती होती. अरुण कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल  हेमा जैन यांचा सत्कार करण्यात आला.

जैन या महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी स्कूल ऑफ आर्ट’च्या प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.

या सत्काराबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी हेमा जैन यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.