Pune : निवृत्त मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन  

Retired Major General P. V. Sardesai passed away

एमपीसी न्यूज – निवृत्त मेजर जनरल पद्मनाभ विद्याधर तथा पी. व्ही. सरदेसाई (वय 80) यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. पाकिस्तान दरम्यान 1965 मध्ये झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्यामु​ळे  त्यांचा विशेष गौरव करण्यात ​​आला होता.

पुण्यातील नामांकित दिवंगत डॉ.ह.वि.सरदेसाई यांचे ते धाकटे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

मेजर जनरल सरदेसाई यांनी 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी​ ​अतुलनीय शौर्य गाजवले होते. त्यांची तुकडी पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर जाऊन लाहोर ​पर्यंत धडकली ​होती. या​ युद्धा दरम्यान ​त्यांच्याजवळच बॉम्ब फुटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बॉम्बचे तुकडे त्यांच्या पाठीच्या कण्यात घुसले होते. नंतर जर शस्त्रक्रिया करून ते काढण्यात आले असते, तर त्यांना कायमचा अर्धांगवायू होण्याच धोका होता. परिणामी संपूर्ण कारकीर्द ते या वेदना सहन करत देशसेवेत कायम राहिले व मेजर जनरलच्या पदापर्यंत त्यांची ​बढती ​झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

‘ भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या,मेजर जनरल पी.व्ही.तथा पद्मनाभ विद्याधर सरदेसाई यांच्या निधनानं भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास काळाच्या पडद्याआड गेलाय.त्यांचं शौर्य व असीम त्याग सदैव स्मरणात राहील.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

या युध्दात एका बॉम्बस्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरही त्यांनी सैन्याच्या माध्यमातून आपली देशसेवा कायम ठेवली. या ऐतिहासिक युध्दाच्या विजयातील महत्त्वाचा योध्दा असणाऱ्या मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांच्या कर्तृत्वाबद्दल आपल्या सर्वांच्या मनात कायमच आदर आणि अभिमान राहील.

मेजर जनरल पी.व्ही सरदेसाई हे पुण्याचे प्रसिध्द धन्वंतरी स्वर्गीय डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे धाकटे बंधू होते. देशसेवेसह वैद्यकसेवेचा मोठा वारसा असणाऱ्या सरदेसाई कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी देवाचरणी प्रार्थना करतो. ‘

अश्या​ शब्दात पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली ​

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.