Pune: चार रुपये प्रति किलोमीटर, शहरात लवकरच ‘ई-बाईक’ भाड्याने मिळणार

Pune: Rs 4 per km, e-bikes will soon be available in the city या उपक्रमांतर्गत जवळपास पाचशे ई - बाइक्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधार समितीने ‘ई-बाईक’ भाड्याने देण्यास मान्यता दिली आहे. ‘ग्रीन पुणे’ उपक्रमांतर्गत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. 

या उपक्रमास पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि जनरल बॉडीची मान्यता मिळाल्यास पुणेकरांना लवकरच या इलेक्ट्रॉनिक बाईक्स शहरात भाडे तत्वावर चालवण्यास मिळतील. ‘व्हीट्रो मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महापालिकेसमोर हा प्रस्ताव सादर केला होता.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत जवळपास पाचशे ई – बाइक्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, शहरात 500 चार्जिंग स्टेशन देखील उभारली जाणार आहेत. शहरात विविध ठिकाणी उभारली जाणारी ही चार्जिंग स्टेशन शहरातील प्रमुख रस्त्यांवर असतील व एका स्टेशन वरती किमान 10 ई- बाइक्स एकावेळी चार्ज करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या ई-बाईकसाठी कंपनीकडून खालील प्रमाणे भाडे वसूल केले जाणार आहे.

अंतर – शुल्क

1 किलोमीटर – 4 रूपये

150 किमी एक दिवस – 450 रूपये

1000 किमी एक आठवडा – 1,900 रूपये

4000 किमी एक महिना – 3,800 रूपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.