Rohit Sharma Resume Practice : हिटमॅन रोहित शर्माने सुरू केला मैदानी सराव

Rohit Sharma Resume Practice: Hitman Rohit Sharma starts field practice

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा सलामी फलंदाज ‘हिटमॅन’ रोहित शर्मा’ने सरावाला प्रारंभ केला आहे. सराव सुरू झाल्याने आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये सरस व सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मी आशावादी असल्याचे रोहित म्हणाला आहे. 

कोरोना पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला व सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. तसेच काही स्पर्धा लांबणीवर टाकल्या गेल्या. त्यामुळे सर्व खेळाडूंनाही घरातच राहावे लागले. आता देशात पाचवा लॉकडाऊन असला तरी मैदाने व क्रीडा संकुले खुली करण्याची परवानगी सरकारने दिल्यामुळे खेळाडूंनाही दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी मैदानी सरावाला सुरूवात केली होती. आता रोहित शर्माने देखील सरावाला सुरूवात केली आहे. रोहित म्हणाला की, सराव कधीपासून सुरू करता येईल याची मीदेखील खूप वाट पाहात होतो. शुक्रवारपासून सराव करण्यास प्रारंभ केल्याने गेल्या तीन महिन्यामध्ये असलेली अस्वस्थता संपुष्टात आली आहे. आता आगामी काळात करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर सुरु होत असलेल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मी आशावादी असल्याचे रोहित म्हणाला आहे.

कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत कुटुंबाला वेळ देता आला याचे समाधान आहे. हा सर्वच खेळाडूंसाठी खूप कठीण काळ होता. न्यूझीलंड दौऱ्यात मला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती व मायदेशी परतावे लागले होते. तेव्हापासूनच मी घरात आहे. आता सराव सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा मानसिक नैराश्य झटकून सराव करत असल्यामुळे खूप आनंद होत आहे, असेही रोहितने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like