Pune : तीन दिवसात सायकलवर 580 किलोमीटर अंतर पूर्ण करून सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पहिले उपपंतप्रधान (Pune) भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यासाठी पुरंदर सायकलिस्ट तर्फे “पुरंदर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी-गुजरात” 580 किलोमीटरची सायकल राईड मोहीम आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसात मोहिम पूर्ण करत सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.

17 ते 19 सप्टेंबर 2013 असे तीन दिवस या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पहिला दिवस पुरंदर(पुणे) ते नाशिक 245 किमी, दुसरा दिवस नाशिक ते सापुतारा पर्वत रांगेतील वघई 145 किमी आणि वघई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी-गुजरात” 195 किमी असा एकूण 580 किमीचा प्रवास या सायकलस्वारांनी केला.

ऊन, उलटे वाहणारे वारे, सापुतारा पर्वत रांगा आणि गुजरात अखेरच्या प्रवासात मोठ्या प्रमाणावर आलेल्या पावसाचा सामना करीत प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम या तीन सायकस्वारांनी यशस्वीपणे पूर्ण केली. संतोष झेंडे, सुहास गदादे हे टाटा मोटर्स कार प्लांट पुणे येथे तर शंतनू निगडे हे ॲटलास कोपको, पुणे येथे कार्यरत आहेत.

Pimpri : गुणवंत कामगार पुरस्काराचे नाव बदलल्याने कामगारांचे कल्याण होणार आहे का? काशिनाथ नखाते

या सायकलस्वारांनी मागील दोन-तीन वर्षात पुणे-पंढरपूर-पुणे, पुणे-कन्याकुमारी, पुणे-पानिपत ते अट्टारी बॉर्डर अशा लांब पल्ल्याच्या मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जगभरातील सर्वात (Pune) मोठा 182 मीटर उंच असलेला पुतळा “स्टॅच्यू ऑफ युनिटी” गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या सरदार सरोवर धरणाच्या नजीक आहे.

या सायकल मोहिमेसाठी इंडो एथलेटिक सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे, अजित पाटील, गिरीराज उमरीकर, श्रेयस पाटील, श्रीकांत चौधरी, युवराज पाटील तसेच पुरंदर सायकलिस्ट क्लबचे दिलीप झेंडे, दिपक जांभळे, मनोज मेमाणे, अजित झेंडे, केतन जगताप यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.