Pimpri : गुणवंत कामगार पुरस्काराचे नाव बदलल्याने कामगारांचे कल्याण होणार आहे का? काशिनाथ नखाते

विश्वकर्मा नाव देऊन भाजपकडून आम्हीच पुरस्कार सुरू केल्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कामगारांना (Pimpri ) नोकरी करत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळातर्फे 1979 पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जात आहे.

मात्र 2014 पासून हा पुरस्कार देण्याचे टाळले गेले असून आता गुणवंत कामगार पुरस्कार ऐवजी “विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार” असे नाव देण्यात येणार आहे. कामगाराला देशोधडीला लावून या पुरस्काराचे नाव बदलून भाजप सरकारकडून कामगारांचे काय कल्याण होणार आहे का? असा सवाल कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी करत हे नाव त्वरित रद्द कण्याची मागणी केली आहे .

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री सुरेश खाडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सुमारे ४३ वर्षाची गुणवंत कामगार आणि कामगार भूषण या पुरस्काराची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षापासून कामगार विविध क्षेत्रांमध्ये काम करत असून त्यामध्ये त्यांचे योगदान कामगारांचे कंपनीत आस्थापनामध्ये काम करून समाजासाठी दिलेले योगदान हे वाखणण्याजोगे आहे.

त्यांना शासनाचा पुरस्कार मिळाल्याने अनेकांना बळ मिळत असून अनेक कामगारांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला कामाचा ठसा उमटवला आहे. इतक्या वर्षात हजारो गुणवंत कामगार झाले. हा पुरस्कार आणि नाव एक समीकरण झाले आहे. त्यामुळे नाव बदलणे अयोग्य आहे.

Electric Vehicle : अनाधिकृतपणे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणे धोक्याचे, संबंधितांवर कारवाईची मागणी

केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक कारागीर (Pimpri)आणि हस्तशिल्प कारागिरांसाठी काही विशेष योजना केल्या आहेत. कामगारांशी संबंधित अनेक योजनांना विश्वकर्मा हे नाव देण्यात आलेला आहे. विश्वकर्माचे नाव जोडल्याने भाजप सरकारने हा पुरस्कार सुरू केल्याची जाहिरात होणार असल्याने हे नाव देण्याचा घाट महाराष्ट्र सरकार करत असून हे अत्यंत चुकीचे आहे.

कामगारांनी घामातून आंदोलनातून मिळवलेले 44 कामगार कायदे रद्द करून केवळ तीन श्रमसंहितेमध्ये त्याचा समावेश करून कामगारांना देशोधडीला लावलेला आहे. कामगारांचे अस्तित्व संपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारने यापूर्वीचे कामगार कायदे पुन्हा लागू करावेत म्हणून अनेक संघटना मागणी करत आहेत.

कामगार कल्याण मंडळाकडे दरवर्षी कल्याण निधी भरणारी खासगी दुकाने, कारखाने, वर्कशॉप, कंपनी, हॉटेल, उपाहारगृहे व बँकांमध्ये किमान पाच वर्षांपासून काम करणारे कामगार, हे गुणवंत कामगार व कामगार भूषण पुरस्कारासाठी पात्र आहेत. संबंधित व्यक्ती पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.मात्र नवीन कामगार कायद्याने कायम कामगारांचे अस्तित्व संपूष्टात आले आहे.

फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमुळे गुणवंत कामगारासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक तो सेवा कालावधी सुद्धा ही आता कामगार पूर्ण करू शकणार नाहीत . या पूर्वीचेच गुणवंत कामगार पुरस्काराचे नाव देण्यात यावे अन्यथा मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशाराही कामगार नेते नखाते यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.