Pune : पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी संगीता झिंजुरके

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या (Pune) वतीने पुढील महिन्यात होणाऱ्या पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा अभ्यासिका ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांची, तर स्वागताध्यपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

Chinchwad – स्नेहमेळाव्यामुळे मुलांमध्ये स्वप्ने बघण्याची जिद्द निर्माण होते – पूजा बीरारी

प्रकाश रोकडे म्हणाले, “संगीता झिंजुरके यांचे संज्योती आणि वादळ मनातले, शब्द तुषार, व्यथा स्त्रीवेदनेच्या, काव्यस्पंदन हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. सत्यार्थी या साहित्यकृतीचे संपादन त्यांनी केले आहे. त्या सातत्याने ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ उपक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर अभ्यासपूर्ण विवेचन (Pune) करत असतात. हरिश्चंद्र गडसिंग यांनी तळेगाव येथे झालेल्या 11 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविले होते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.