Pune : ससून रुग्णालयातील 26 डॉक्टर केरळला रवाना

एमपीसी न्यूज- केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. आणि कोट्यधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. पुण्यातील केरळवासीयांनी ओणम सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून जमा होणारी रक्कम केरळला मदत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता पुण्यातील ससून रुग्णालयामधून 26 डॉक्टरची टीम केरळला रवाना झाली आहे. वैद्यकीय संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्या पथकात हे 26 डॉक्टर पुरग्रस्तांच्या आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करणार आहेत.

या टीममध्ये मेडिसिन पेडियट्रिक्स, गायनकलोजी प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विभागातील तज्ञ डॉक्टर आहेत अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी दिली आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध राज्यांतून देखील डॉक्टर्सच्या टीम केरळला दखल झाल्या आहेत. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होऊ शकतो. अशी भीती वर्तवली जात आहे. उलट्या, जुलाब, व्हायरल फिव्हर आणि अन्य साथीच्या आजारांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सांभाळणाऱ्या अनिल वासुदेवन यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.