22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Pune Scouts & Guide: पुणे भारत स्काऊट आणि गाईड संस्थेच्या सहाय्यक आयुक्तपदी ॲड. मुथा

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी . राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा उर्फ भाऊ यांची  (Pune Scouts & Guide) पुणे भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेसाठी सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती मंगळवारी (दि.2) रोजी करण्यात आली.

 

यावेळी श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेजच्य प्राचार्या सुनिता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, विभाग प्रमुख  उमाकांत काळे ,संतोष शिरसाट, स्काऊट विभाग प्रमुख दीपक सुतार, वंदना ताकभाते व स्काऊटचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून ॲड. मुथा यांचा पुष्पगुच्छ, स्काऊटचे प्रतीक असलेले ओगल व स्कार्फ घालून सत्कार केला.

 

Dehuroad News: देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन ‘डीपीआर’ तयार; लवकरच निविदा प्रसिद्ध होणार – श्रीरंग बारणे

 

संस्थेचे माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी कै. श्री शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांनी 1974 साली शंभर पथकांची जुळणी करून भारत स्काऊट गाईड संस्था पिंपरी चिंचवड येथे स्थापन केली त्या संस्थेचे ते कार्यकारी अध्यक्ष होते. (Pune Scouts & Guide) या स्काऊट गाईड चळवळीचा प्रसार व प्रचार व्हावा आणि गुणात्मक व संख्यात्मक वाढीसाठी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्ती बद्दल श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांकडून ॲड. मुथा यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

spot_img
Latest news
Related news