Pune : मार्केट यार्डमधून मिळतेय 5 रुपयांत शिवभोजन थाळी पार्सल

एमपीसी न्यूज – मार्केट यार्डमधून गरजू नागरिकांना केवळ 5 रुपयांत शिवभोजन थाळी पार्सल देण्यात येत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 अशी वेळ ठरवून देण्यात आली आहे. पार्सल थाळी घेण्यासाठी नागरिकांमध्ये साडे 3 फूट अंतर ठेवले जात आहे. 200 पार्सल थाळी दिली जात आहे. यापूर्वी शिवभोजन थाळी 10 रुपयांना दिली जात होती.

शिवभोजन थाळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मर्यादित थाळी असल्याने खूप जण वापस जात आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवभोजन थाळी ही महत्वपूर्ण योजना आहे. सुरुवातीला तिची किंमत 10 रुपये होती. मात्र, कोरोनामुळे या थाळीची किंमत आता 5 रुपये करण्यात आली आहे. गोरगरीब नागरिकांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी ही योजना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.