Market Yard : कोणतीही भाजी घ्या, 60 ते 80 रुपये दर

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्या – फळभाज्यांना (Market Yard) बसला आहे. बाजारात कोणतीही भाजी 60 ते 80 रुपयाला उपलब्ध आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. शेवगा आणि मटारचा दर 100 रुपयांवर गेला आहे.

 

 

Narendra Modi Pagadi : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पगडी सज्ज

परराज्यातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून मटरची, तर तामिळनाडू येथून शेवग्याची आवक होत आहे. बाजारात मागणी जास्त असून पुरवठा कमी होत असल्याने शेवगा आणि मटरचे दर शंभरीपार गेले आहेत. सोबतच टोमॅटोही 100 रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विकला जात आहे.

 

 

 

 

पुण्याच्या बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. नवीन कांद्या बरोबरच जुन्या कांद्यालाही चांगली मागणी आहे. सध्या मार्केटयार्डात (Market Yard)  7 ते 10 हजार क्विंटलपर्यंत रोज आवक होत आहे. होलसेल बाजारात कांदा 5 ते 15 रुपये किलो आहे.  किरकोळ बाजारात 20 ते 30 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर आणि मेथीची आवक स्थिर आहे. घाऊक बाजारात पालेभाज्या प्रती जुडीचे भाव 5 ते 20 रुपये तर, किरकोळ बाजारात 20 ते 40 रुपये दर आहे. कांदापात, कोथिंबीर, शेपू, व मेथीचे प्रती गड्डीचे दर 15 रुपयांपासून 40 रुपये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.