Pune : दहावीच्या तोंडी परीक्षेचे 20 गुण रद्द केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचा मोर्चा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत तोंडी परीक्षेचे 20 गुण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ आज शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात पुणे शहर प्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक विशाल धनवडे तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बाळा कदम म्हणाले, “शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावी मधील विद्यार्थ्याच्या तोंडी परीक्षेचे 20 गुण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 15 लाख विद्यार्थ्याच निर्णयामुळे नुकसान होणार आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून हा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.