Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अयोध्येतील श्रीराम मंदिर देखाव्याचे गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती (Pune) ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

या सजावटीचे उदघाटन औसा संस्थान, नाथ संस्थांनचे पिठाधीपती प.पू. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.हा उदघाटन सोहोळा पाहण्यास हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये 24 खांब व 24 कमानी उभारण्यात आले आहेत.

Ganeshotsav 2023 : ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाचे सर्वत्र आगमन

मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस आहेत.

तसेच मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये (Pune) असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये 60 खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे.

तर भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.