Ganeshotsav 2023 : ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाचे सर्वत्र आगमन

एमपीसी न्यूज – सालाबाद प्रमाणे यावर्षीही (Ganeshotsav 2023 ) गणरायाचे मोठ्या उत्साहात, आनंदात, भक्तिमय वातावरणात आगमन झाले. शहरात सर्वत्र ढोलताशांचा निनाद ऐकायला मिळाला. लहान मुलं, युवक – युवती आणि ज्येष्ठांसह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने गणरायाच्या आगमन सोहळ्यात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पारंपरिक वाद्याच्या जोडीला पारंपरिक वेशभूषेची जोड देत विविध गणेश मंडळाच्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी मोठ्याप्रमाणात तरुणांच्या चमूने गर्दी केली, शहरात सर्वत्र उभारण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या मंडपांमध्ये गणराज मोठ्या थाटमाटात विराजमान झाल्याचे पाहायला मिळाले.

तर घरोघरी बाप्पाचे आगमन होताना बाप्पाच्या आगमनाचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. नेत्रदीपक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी सजावट, आकर्षक देखावे, गुलालाची उधळण, फुलांची आणि फळांची आरास मांडून गणरायाच्या स्वागताचा सोहळा दैदीप्यमान करण्यात आला.

यावेळी अधूनमधून वरुणराजानेही हजेरी लावत बाप्पाचे स्वागत केले. शहरात ठिकठिकाणी मोठ्यासंख्येने गणरायाचे अगमन झाले.

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वाहन चालक दिन साजरा

यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने लोकांच्या सेवेकरिता हजारोच्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. वाहतूक विभागाद्वारे सोयीच्या दृष्टीने वाहतुकीत बदल करून पर्यायी ररस्त्यांवर वाहतूक वळविण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.