Pune : ‘कोरोना’मुळे लक्ष्मी रोड, मंडई, तुळशीबाग परिसरात शुकशुकाट!

एमपीसी न्यूज – नेहमीच गजबजलेल्या लक्ष्मी रोड, मंडई, तुळशीबाग परिसरात मागील 2 ते 4 दिवसांपासून शुकशुकाट जाणवत आहे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, खवय्यांना नेहमीच आवडणारे हॉटेल वैशाली, गंधर्व सुद्धा बंद आहेत. सर्वच हॉटेल बंद आहेत. कोरोनामुळे हा परिणाम दिसत आहे.

त्यामुळे पुणेकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे. एरवी कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. सध्या कर्वे रस्ता, पौड रस्ता, एनडीऐ रस्ता, शहरातील सर्वच रस्ते, उपनगरांतील रस्ते ही रिकामे पडले आहेत. लोकांनी स्वतः हुनच घरी राहण्यास प्राधान्य दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.