Pune : सोलो सितार कॉन्सर्टला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Pune) सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित समीप कुलकर्णी यांच्या ‘सोलो सितार कॉन्सर्ट ‘ या सतार वादन कार्यक्रमाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच तबल्यावर रोशन चांदगुडे यांनी साथ संगत केली.

समीप कुलकर्णी हे उस्ताद उस्मान खान, पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ यांचे शिष्य आहेत. शनिवारी दि.27 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला. भारतीय विद्या भवनचे प्रसिद्धी प्रमुख दीपक बीडकर यांनी कलाकारांचा सत्कार केला.

Pune News : आंबील ओढा पुस्तकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

समीप कुलकर्णी यांनी सुरूवातीस राग श्यामकल्याण सादर केला. त्यात आलाप, जोड, उपज, छाला पेश केला. ताल हनुमंत मध्ये साडेदहा मात्रांच्या तालातील स्वरचित रचना सादर केली. ताल एक ताल, तीन ताल मधील (Pune) रचना सादर केल्या. राग मिश्र खमाजमध्ये धून सादर केली.

या सर्व सादरीकरणाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मेडलेचा वापर करून अनेक बहारदार मराठी -हिंदी गीते सादर केली. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 166 वा कार्यक्रम होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.