Pune : फडणवीस यांनी दिलेले संदर्भ अर्धवट ज्ञानावर आधारित – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Pune) यांनी गत-काळातील काही विधानसभा व संसदीय गॅलरी व संसदेतील काही (अॅनेक्स) उपभागांच्या भुमिपूजन व उदघाटनांचा संदर्भ अयोग्य आणि अर्धवट ज्ञानावर असल्याची टीका कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असतानाही अर्धवट माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करुन अयोग्य प्रसंगाचे दाखले देत आहेत. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारची खोटी वक्तव्ये व संदर्भ देणे टाळावे आणि तोंडघशी पडू नये, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

गोपाळ तिवारी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने कसरत करावी लागत आहे. त्याकरिताच त्यांच्या चुकीच्या निर्णयांचे लंगडे समर्थन त्यांना करावे लागत आहे. फडणवीस यांनी देशाचे संघराज्यरुपी संविधानिक रचना, इतिहासातील सत्य घटना समजून घेऊनच भाष्य करावे. जुने संर्दभ देताना सोईस्कर अर्धवट ज्ञानावर ते देऊ नयेत. पार्लमेंट हाऊस अॅनेक्सचे भूमिपूजन 3 ॲागस्ट 1970 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते व उपराष्ट्रपती जी. एस. पाठक व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत झाले होते.

संसदेच्या ग्रंथालयाचे भूमिपूजन ऑगस्ट 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान (Pune) राजीव गांधीच्या हस्ते झाले होते. मात्र, त्यानंतर त्याचे लोकार्पण 7 मे 2002 रोजी तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते झाले. त्यामुळे देशातील ऐतिहासिक घटनांची नोंद फडणवीसांनी योग्य रित्या ठेवावी आणि राजकीय आकसापोटी दिशाभूल वक्तव्ये करु नयेत आणि काँग्रेस वर केलेल्या चुकीच्या आरोपांबद्दल माफी मागावी.”

Pune News : आंबील ओढा पुस्तकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वपूर्ण मानला जातो. परंतु पंतप्रधान यांनी एकाधिकारशाहीचा वापर करत कोणाशीही चर्चा न करताच् कोरोना संकटाच्या काळात नवीन संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा) बांधण्याचा घाट घालून कोटयावधी रुपयांचा खर्च केला. संविधानिक परंपरापेक्षा स्वार्थी भावनेने नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. लोकशाही मूल्यांची पदोपदी पायमल्ली करणाऱ्यांनी लोकशाहीस गृहित धरुन विरोधकांना लोकशाहीवरील विश्वासाबद्दल प्रश्न विचारणे हास्यस्पद असल्याचेही तिवारी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.