Pune : दारुंब्रे गावचे सरपंच सोमनाथ वाघोले यांना आदर्श सरपंच पुरस्कार

सूर्यकांत सोपान वाघोले यांना आदर्श ग्रामविकास कार्यकर्ता पुरस्कार

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दारुंब्रे गावचे सरपंच सोमनाथ तुकाराम वाघोले यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला व तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत सोपान वाघोले यांना आदर्श ग्रामविकास कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष व राज्यमंत्री शेखर चरेगावकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, कविवर्य उद्धव कानडे, शिरीष चिटणीस, रवींद्र डोमाळे, आदी उपस्थित होते.

सरपंच सोमनाथ वाघोले यांनी दारुंब्रे गावामधे विविध विकासकामे केली आहेत. त्यामधे प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारुढ स्मारक, गावातील मारुती व विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील अन्तर्गत रस्ते व शेजारील गावांना जोडणारे रस्ते, वाड्यावस्त्यावर पाण्याचे नियोजन करून दोन वस्त्यांवर दोन टाक्या व पाईपलाईन टाकणे अशी विविध कामे केली आहेत. वर्षभरात एकूण 3 कोटींची विकासकामे केली आहेत. त्यांच्या या विकासकामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

” हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन गावातील सर्व नागरिकांचा आहे सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे मला गावातील कामे करण्याची प्रेरणा मिळाली व हा पुरस्कार घेण्यासाठी मी पात्र ठरलो” असे सोमनाथ वाघोले यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.