Pune: लोकसभेत सोनिया गांधी नसणार ,याची उणीव भासणार -सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – काँग्रेस भवनमध्ये येतांना आनंद वाटतोय. मला खासदार(Pune) म्हणून निवडून दिले, त्यात राष्ट्रवादी प्रमाणेच काँग्रेस कार्यकर्त्यांचे योगदान आहे. संसदेत सोनिया गांधी प्रत्येक विषयात सहभागी होतात.
लोकसभेत सोनिया नसणार यांची नेहमीच उणीव भासणार आहे, (Pune)असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर कार्यकर्ता मेळावा आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुळे बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, भ्रष्टाचार मुक्त करण्यात आम आदमी पार्टीचाच मोठा वाटा आहे. काँग्रेस भवनला 100 वर्षांचा इतिहास आहे. माहात्मा गांधीमुळे ही पवित्र वस्तू आहे. निर्मला सत्यनारायण यांनी 10 वर्षांत भ्रष्टाचार असल्याचे सांगितले, मग एवढी वर्षे काय झोपले होतात का? अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केला असे, भाजपने म्हटले. त्यानंतर चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप नव्हे भ्रष्ट जुमला पार्टी झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. चव्हाण यांच्यावर तुम्ही केलेले आरोप खरे होते का? याचा खुलासा करावा. खरे असेल तर त्यांना भाजपमध्ये का घेतले, खोटे असेल तर काँग्रेसचे जाहीर माफी मागावी.
मुलांचे पेपर फुटतायेत, ट्रिपल इंजिन सरकारला हे रोखण्यासाठी आवाहन करत आहे. बेरोजगारी, माहागाई, भ्रष्टाचार मोठे प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर व्हाइट पेपर पाहिजे. 2 वर्षे झाले नगरसेवक पदाची निवडणूक होत नाही. 2024 ची ही दडपशाहीची निवडणूक आहे. त्या विरोधात सर्वांनीच आवाज उठविण्याची गरज आहे. नवीन चिन्ह मिळाल्याचे नांदी आहे. तुतारी मिळाल्याचे आनंद आहे. आता लोकसभा निवडणुकीला लागण्याचे आवाहन सुळे यांनी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.