Pune Suicide : पत्नीच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या 

एमपीसी न्यूज – पत्नीच्या त्रासामुळे कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने हडपसरमधील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Pune Suicide) केल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

विलास गेनबा लगड (वय 62 , रा. लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, हडपसर) असे आत्महत्या (Pune Suicide) केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.तर या प्रकरणी आरोपी पत्नी सुजाता गुरव (वय 50) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विलास लगड यांची पहिली पत्नी ललिता यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मागील वर्षी सुजाता यांच्याशी विलास लगड यांनी दुसरा विवाह केला.या विवाहानंतर सुजाता यांनी घर नावावर करण्याची मागणी सतत करीत होत्या. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वादाचे देखील प्रकारे घडले.

Pavana Dam updete:  पवना धरण परिसरात पावसाची विश्रांती; पाणीसाठा 97 टक्यांवर

पत्नी सुजाताच्या त्रासामुळे विलास लगड हे मे महिन्यात घर सोडून निघून गेले होते.त्यावेळी पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पु्न्हा घरी आणले होते. त्यानंतर विलास लगड आणि पत्नी सुजाता हे वेगळे राहत होते.

त्यानंतर मागील आठ दिवसांपासून पुन्हा सुजाताने त्रास देण्यास सुरुवात केली.त्यानंतर विलास लगड यांनी हडपसर भागातील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Pune Suicide) केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

मयत विलास लगड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुजाताच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती आढळून आली असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईल फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग देखील करून ठेवले होते. ते समोर आले असून विलास लगड यांच्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी सुजाता लगड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.