Pune : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयित मृत्यू

एमपीसी न्यूज – अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृत्यू झाला. पतीचे निधन झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसात ही घटना घडल्याने याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी (दि. १२) दुपारी काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मधु संकेत मार्कंडेय (वय ३२, रा. रहाटणी) असे भाग्यश्री मोटे हिच्या मयत बहिणीचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधु मार्केंडेय यांचे पती संकेत मार्कंडेय यांचे २५ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मधू या त्यांच्या वडिलांकडे राहत होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मधू केक बनविण्याचे काम करीत होत्या.

दरम्यान, मधु या रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मैत्रिणीसोबत काळेवाडी परिसरात रुम पाहण्यासाठी गेल्या होत्या. घरमालकीणीने रुम दाखविली. त्यावेळी मधू यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नातेवाईकांकडून संशय व्यक्त

मधु यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर मधु यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

Pune News : शारदा महिला संघाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.