Pune : मुलाला गंभीर आजाराचे निदान झाल्याने मुलासह पत्नीला सोडले

पत्नीची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज – मुलाला गंभीर आजाराचे (Pune) निदान झाल्याने पतीने पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला सोडले. पतीने मुलाच्या उपचारासाठी खर्च करण्यास नकार दिला. तसेच पतीने पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले असल्याची तक्रार पत्नीने पोलिसात दिली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करून आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

लोणी काळभोर येथील राजकिरण मिसाळ आणि त्यांच्या आई, वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार महिलेचा विवाह राजकिरण याच्यासोबत डिसेंबर 2019 मध्ये झाला. काही महिने संसार सुरळीत चालला. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांना एक मुलगा झाला.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, जन्मानंतर तीन महिन्यांनी मुलगा आजारी पडू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याला थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. त्याच्यावरील उपचारासाठी 30 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. हे समजल्यानंतर सासरच्या लोकांनी तक्रारदार महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. आमच्याकडे बाळाच्या उपचारासाठी पैसे नाहीत, त्याला मारून टाक, एवढा खर्च कोण करणार, त्यापेक्षा आम्हला तू नको आणि तुझा (Pune) मुलगाही नको, असे म्हणून त्रास दिला.

तक्रारदार महिला सध्या तिच्या वडिलांच्या घरी राहत असून त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. बाळाच्या उपचारासाठी प्रत्येक महिन्याला हजारो रुपयांचा खर्च येत आहे. तक्रारदार महिलेने पतीला सासरच्या लोकांना विनंती केली असता त्यांनी त्यास दाद दिली नाही. महिलेने पुणे येथील भरोसा सेलकडे तक्रार केली असता ‘आम्ही सामोपचाराने मिटवून घेऊ’ असे सांगून पतीने तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. महिलेच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Pune : देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपूर येथे घेतले श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन

पतीने मुलाची जबाबदारी घ्यावी आणि त्याच्यावर उपचार लवकरात लवकर व्हावेत, अशी मागणी महिलेने केली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार महासंघाचे सचिव प्रदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक भालेराव, अक्षता सेठीया, शीतल दहिफळे, अविनाश जाधव हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.