Pune : भाजीपाला टंचाईमुळे पुणेकरांना आता कडधान्यवरच गुजराण करण्याची वेळ

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या रोगाचे रुग्ण वाढत असताना मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरही झाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्ड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांना भाजीपालाची टंचाई जाणवत आहे. तर, कडधान्यवरच गुजराण करण्याची वेळ आली आहे, असेच चित्र आहे.

सध्या तूरडाळ 120 ते 130 रुपये किलो, मुंग आणि उडीद डाळ 130 ते 140 रुपये किलो, चनाडाळ 80 ते 100 रुपये किलो, मसूर डाळ 80 ते 90 रुपये किलो, वाटाणा 90 ते 100 रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. बाजारात कामगार नसल्याने किराणा मालाचे दर वाढले आहेत. त्याचा तोटा सामान्य माणसालाच सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे बटाटा 50 ते 60 रुपये किलो, कांदा 70 ते 80 रुपये किलो, टोमॅटो 50 ते 60 रुपये किलो, वांगे 60 ते 70 रुपये किलो, गवार 60 ते 70 रुपये किलो, आलं 70 ते 80 रुपये किलो, मिर्ची 120 ते 130 रुपये किलो, कोथिंबीरची गड्डी 50 ते 60 रुपये, फ्लॉवर 60 ते 70 रुपये किलो, काकडी 80 ते 90 रुपये किलो, पत्ता कोबी 60 ते 70 रुपये किलो, लसुण 200 ते 220 रुपये किलो दराने विकला जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश पुणेकरांनी चिकन, मटण, मासे खाण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर, भाजीपाला टंचाई असल्याने आता कडधान्यवर वेळ काढणाची वेळ आली आहे. मागील 21 दिवसांपासून पुणेकर त्रस्त झाले आहेत. मात्र, आता काहीच पर्याय नसल्याने या संकटाचा सामना करावा लागत आहे.

एरवी जागोजागी रसरशीत फळांची स्टोल पुणेकरांना बोलवत असतात. सध्या फळांचीही मार्केट यार्डमध्ये विक्री होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सफरचंद, खरबूज, द्राक्षे काही मोजक्याच ठिकाणी विकली जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.