Pune : मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार

मराठा  विरुद्ध ओबीसी लढत, पुण्यात काँग्रेसला विजयाची गॅरंटी 

एमपीसी न्यूज – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यंदा ( Pune) मतदानातून सत्ताधारी भाजपलाच काय त्यांच्यासमवेत सत्तेत सहभागी झालेल्या  शिवसेना – राष्ट्रवादी पक्षांना ( गट)  त्याची  मोठी झळ बसणार असल्याची दाट शक्यता आहे. नेमक्या या स्थितीचा काँग्रेसने फायदा उठवला तर पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची नामी संधी काँग्रेसला आहे.

मात्र, त्यासाठी ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्यास  ओबीसी  वर्गासह मराठा समाजाची मते काँग्रेससाठी निर्णायक ठरतील.  त्यातही  काँग्रेस पक्षाने केलेल्या नव्या धोरणानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेला निष्ठावंत  चेहरा  दिला तर पुणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे चित्र पाहावयास मिळू शकते.

 पुणे लोकसभा मतदारसंघात  भाजपने  मराठा कार्ड खेळले असले तरी मराठा आरक्षण प्रश्नावरून मतांची विभागणी अटळ असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे काँग्रेसने यंदा ओबीसी उमेदवार देऊन मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत  केल्यास काँग्रेसच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर ठरेल. पण, नवा चेहरा रिंगणात उतरविल्यास मतांचे समीकरणही  सहज साध्य आहे.

PMRDA : पीएमआरडीए केवळ बांधकाम परवानग्या देणारे प्राधिकरण न राहता, विकास करणारे प्राधिकरण व्हावे – माजी नगरसेवकांनी व्यक्त केली अपेक्षा

त्यामुळे  एकेकाळी पुण्याचा हा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून  ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेल्या  जुन्या निष्ठावंतांना  संधी दिली तर काँग्रेसला विजयाची गॅरंटी निश्चित राहील. यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने   एक महत्वाचे धोरण तयार केले आहे.  लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे आणि विजय कसा मिळेल यासाठी  हे धोरण आहे.

त्यानुसार विजयाची खात्री असलेल्या   नव्या व्यक्तींना यंदा प्राधान्य दिले जात आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्याचे प्रतिबिंब  उमटले आहे. या धोरणानुसार एका व्यक्तीला दोन पदे मिळणार  नाहीत, की  विद्यमान आमदारांना   लोकसभेसाठी रिंगणात उतरवले जाणार नाही तसेच  ज्यांनी आजवर लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवली. पण, पराभव पत्करला आहे. त्यांनाही संधी देऊ नये असे हे धोरण आहे. त्यामुळे पुण्यात ओबीसी नवीन उमेदवार दिला तर  काँग्रेसला विजय निश्चित  ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.