Pune : शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या पुर्वनियोजनाची बैठक संपन्न; युवराज संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची बैठक नुकतीच पुण्यामध्ये शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, “यावर्षी राज्यभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युद्ध कलांना पोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे महादरवाज्यात कोंडी होऊ नये, यासाठी समिती च्या माध्यमातुन विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.

  • शिवराज्यभिषेक सोहळा जगभरात पोहचण्यासाठी विविध देशांच्या राजदुतांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवभक्तांची कोंडी टाळण्यासाठी नानादरवाजा येतील मार्ग गड उतरण्यासाठी आणि चित्त दरवाजा येथील मार्ग गड चढण्यासाठी वापरण्यात येणार आहे.”

यावेळी सूत्रसंचालन विराज तावरे यांनी केले तर, प्रास्तविक अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले.

  • यावेळी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती,यौवराज शहाजीराजे छत्रपती, राजेंद्र कोंढरे, समितीचे पदाधिकारी आणि शिवभक्त उपस्थित होते, अशी माहिती शिवराज्यभिषेक सोहळा समितीचे सदस्य धनंजय जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.