Pune : पोलीस अधिकारी आणि शहरातील मानाच्या गणपती मंडळांची बैठक पडली पार

एमपीसी न्यूज  – गणेशोत्सवासंदर्भात आज पुण्यात ( Pune ) पोलीस अधिकारी आणि शहरातील मानाचे गणपती तसेच पुणे पोलिस आयुक्तालयाच्या झोन1 मध्ये असणाऱ्या गणेश मंडळांची बैठक पार पडली.

या  बैठकीला मानाचे गणपती मंडळांचे अध्यक्ष तसेच शहरातील इतर मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Chakan : लग्न झाल्याचे लपवून प्रेमसंबंध ठेवणाऱ्या शिक्षकास 7 वर्षांची शिक्षा ; खेड न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

यावेळी  गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिस आणि गणेश मंडळ एकत्रीतपणे काम करणारअसल्याचे ( Pune ) ठरविण्यात आले.तसेच मंडळांनी काही प्रमुख मागण्या आणि शिफारशी पोलिसांकडे व्यक्त केल्या. पोलिसांनी देखील गणेश मंडळांना मार्गदर्शन केले.

गणेश मंडळांच्या बॉक्स कमानींची संख्या वाढवण्यात यावी यातून मंडळांना जास्त उत्पन्न मिळेल,दर वर्षी परवानगी साठी प्रशासनाकडे न जाता एकाच वेळी 5 वर्षांचा परवाना देण्यात यावा,गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळात शहरातील शाळांमध्ये पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी,विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण होण्याकडे लक्ष देणे, प्रबोधनात्मक देखावे करण्यावर भर देणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात ( Pune ) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.