Chakan : लग्न झाल्याचे लपवून प्रेमसंबंध ठेवणाऱ्या शिक्षकास 7 वर्षांची शिक्षा ; खेड न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

एमपीसी न्यूज  – विवाह झाल्याचे लपवुन प्रेमसंबध ठेवत  लग्नाचे (Chakan) अमिष दाखवत तरुणीवर शाररीक संबध ठेवण्या-या शिक्षकाला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी 7 वर्ष सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली .

बाळासाहेब लक्ष्मण बांगर ( वय 40 रा वंजारी चिंचपूर, जिल्हा बीड ) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

सांगली येथे डी. एड. चे शिक्षण घेत असताना पिडित युवतीची  आरोपी शिक्षक बाळासाहेब लक्ष्मण बांगर यांची ओळख झाली. मैत्रीतुन लग्नाच्या आणाभाका घेत त्यांचे प्रेमसंबंध निर्माण  झाले .  2006  ते 2012 या काळात आरोपी शिक्षक बाळासाहेब बांगर याने विविध ठिकाणी पिडितेस लॉजवर नेऊन शाररीक संबंध प्रस्थापित केले .

युवतीला आरोपीचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर पिडिता आणि आरोपी यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपी शिक्षकाने पिडितेकडून 5 लाखांची  मागणी करुन पैसे दिले नाहीतर अश्लिल शारीरिक संबधाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

Chakan : कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार

ऑक्टोबर 2012 मध्ये सांगलीवरून पिडित तरुणीला राजगुरुनगर येथे आरोपी शिक्षकाने बोलावून घेऊन तिच्याशी भांडण करून तिला मारहाण करत पाच लाखांची  मागणी केली. प्रियकराच्या पैशाच्या मागणीला आणि फसवणुकीला कंटाळून अखेर तिने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. मात्र तो जामिनावर बाहेर आला होता.

हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायालयात न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या पुढे सुरु होता. याचा निकाल आज दि. 10 आॅगस्ट रोजी देण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी 7 साक्षीदार तपासले.

पिडित तरुणी, वैद्यकीय अधिकारी,विविध लॉजचे मॅनेजर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.  आरोपी बाळासाहेब लक्ष्मण बांगर (Chakan) यास भारतीय दंड विधान कलम 376 खाली 7 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने कारावास तसेच अन्य कलमान्वये दंड आणि शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.