Pune : ‘भानगड’ या एकांकिकेने पटकावला यंदाचा पुरुषोत्तम करंडक

एमपीसी न्यूज – औरंगाबादच्या (Pune) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भानगड या एकांकीकेने यंदाचा पुरुषोत्तम करंडक पटकावला आहे. यावेळी केवळ सर्वोत्कृष्ठ एकांकिका नाही तर अभिनय नैपुण्य स्त्री तसेच दिग्दर्शन याचेही पारितोषीक ‘भानगड’ने पटकावले आहेत.

पुण्यातील भरतनाट्य मंदिर येथे रंगलेल्या पुरुषोत्तम कंरडक महाअंतिम फेरीचा निकाल सोमवारी (दि.26) घोषित करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक भानगडला मिळाला, तर द्वितीय क्रमांक बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने सादर केलेल्या भू-भू या एकांकीकेला मिळाला, तर तृतीय क्रमांक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘कुपान’ या एकांकिकेने पटकावला. तर, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक करंडक साखराळे येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘टू मी ऑर नॉट टू मी’ या एकांकीकेला मिळाला आहे.

पारितोषीक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे आयुक्त अभिनय कुंभार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश पांडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषीक देण्यात आले. यावेळी कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर आदी उपस्थित होते.

Moshi : डिज्नी ग्रुप ऑफ स्कूल्सचा स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

या बरोबरच सर्वोत्कृष्ठ अभिनय हा पुरस्कार बिराड (Pune) या एकांकिकेच्या संस्कार लोहार या विद्यार्थ्याला मिळाला, तर अभिनय नैपुण्य पुरुष हा भू-भू या एकांकिकेतील सनी पवारला, अभिनय नैपुण्य स्त्रीचा भानगडमधील वैष्णवी काळे, सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य हा गाभार एकांकिकेच्या शौनक कुलकर्णीला तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन हा भानगडचे दिग्दर्शक निखील नरवडेला मिळाला आहे.

या करंडकचे परिक्षण संजय पेंडसे, सुबोध पांडे आणि नितीन धुंदके यांनी केले. तर, सुत्रसंचालन आणि आभार राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.