Talegaon : ‘नृत्यं वंदे’….रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारे सादरीकरण

एमपीसी न्यूज : ”डॉ. मिनल कुलकर्णी यांच्या सृजन विद्यालयाचे सृजन नृत्य विद्यापीठात रुपांतर व्हावे, इतके ताकदीचे कलाकार आणि अप्रतिम नृत्ये या (Talegaon) महोत्सवात पहायला मिळाली आहेत. गेल्या 27 वर्षांची अथक मेहनत फलद्रूप होताना दिसते आहे. शास्त्रीय नृत्य शैलीतला इतका मोठा महोत्सव तळेगाव सारख्या ठिकाणी आयोजित करणे हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे” असे मत प्रा. जयंत जोर्वेकर यांनी व्यक्त केले. निमित्त होते सृजन नृत्यालयाच्या नृत्य महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या ‘नृत्यं वंदे’ या कार्यक्रमाचे. नृत्य महोत्सव कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न झाला. यावेळी मुग्धा जोर्वेकर, दिलीप कुलकर्णी, मकरंद जोशी, कामिनी जोशी, अभिजित कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन झाले. ‘सप्तसूर झंकारीत बोले’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तेजस माने, ज्योती देशपांडे, अनुश्री मुदगल यांनी नांदी नृत्य रुपात सादर केली. लक्ष्मी, ज्वाला, योग नरसिंह अशी रूपे रसिकांनी अनुभवली ‘नरो हरि नारायण’ या रचनेतून. अदिती अरगडे, पूजा कडवे – कुलकर्णी, प्रियांका कुलकर्णी, आकांक्षा गजभीव, चित्रांगी राजे, मैत्रेयी कोल्हापुरे, स्फुर्ती शेट्टी, गौरवी मेहेरकर यांनी ही रचना सादर केली.

साहित्य आणि नृत्य याचा सहसंबंध स्पष्ट करणारी ‘मुदा करात मोदकम’ ही रचना सादर झाली. अनुजा झेंड, तेजस्विनी गांधी, मुग्धा बिचकर, जान्हवी सरोदे, समा भावसार यांचा सहभाग (Talegaon) होता. सिद्धी शहा, सुप्रिया नायर, रचना वळवडे, अंकिता कुचेकर, शामली देशमुख, सायली यादव, अंजली कारभारी यांनी नटराजाची प्रार्थान करणारी ‘हे नटराज देवाधिराज’ ही रचना सादर केली. ‘नि:शब्दांचे आकाश अमुचे’ या बालगीताचे अप्रतिम सादरीकरण अन्वयी दाभाडे, विश्वजा जायगुडे, आयुषी खेडकर, रुचिका खेडकर, श्रीकृती चावली, श्रावणी पणशीकर, प्रेक्षा पवार, आयुषी झोमटे यांनी केले.

ऋषीच्या स्तोत्रावरील रचना ‘ऋषिदर्शन’ या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. वेदांची निर्मिती करणारे महर्षी वेदव्यास, जन्म – मृत्युचं तत्वज्ञान उलगडून सांगणारे याज्ञवल्क्य ऋषी, ग्रहांच्या स्थितीविषयी मार्गदर्शन करणारे गार्ग्य मुनी, प्रत्यक्ष सूर्यावर ज्यांनी बाण रोखला ते तेजस्वी जमदग्नी, ज्याचं कार्य ऋषितुल्य आहे असे भक्तिमार्ग दाखवणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. या ऋषीच्या स्तोत्रावरील रचना डॉ मिनल कुलकर्णी, शरयु पवनीकर, कौमुदी जोशी, प्रणोती काळे, गायत्री रानडे यांनी सादर केल्या. ‘सखी आले तत्र भवान’ या गो नि दांडेकर लिखित ‘यशोधरा’ संगीतिकेमधील नृत्याने रसिकांची मने जिंकली. अमृत संजीवनी या ज्ञानेश्वर महाराजांच्या नृत्य नाट्यातील ‘देवाचिये द्वारी’ या रचनेने भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली.

Pune : ‘भानगड’ या एकांकिकेने पटकावला यंदाचा पुरुषोत्तम करंडक

विनायक लिमये यांचे संगीत होते. वसंत, ग्रीष्म, शिशिर, वर्षा, हेमंत, शरद हे (Talegaon) ऋतु सरगममालेतून दाखविण्यात आले. संगीत कै. पं. शरद जोशी यांचे होते. शंकराचार्य विरचित ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्र’ नृत्यरचनेच्या माध्यमातून अदिती अरगडे, पूजा कडवे- कुलकर्णी, सई जोशी, गौरवी मेहेरकर, रुतवी बसुदे, आकांक्षा गजभीव, काजल राळे, चित्रांगी राजे, प्रज्ञा साळवे, सायली यादव, अंजली कारभारी, स्फूर्ती शेट्टी, रिशिका सांडभोर, रसिका टेकवडे, मैत्रेयी कोल्हापूरे यांनी सादर केले. कार्यक्रमाचा समारोप भारतमातेच्या स्तोत्राने झाला. अनुराधा कुलकर्णी, आद्या जोशी, भाग्यश्री कोत्तावार, अनुष्का बहिरट , तनिष्का इखे, आकांक्षा इखे, मानसी देशमुख, स्वरांगी गानू, क्षितीजा मांडे, अंशिता झोमटे, मोक्षदा नाफडे, अवनी भोते, आर्या बेल्हेकर, गार्गी हस्ती, पूर्वा बवले, रमा देशपांडे, तृषा महेंद्रकर, श्रृती कुलकर्णी या कलाकारांचा यामध्ये सहभाग होता.

कार्यक्रमाचे संगीत संयोजन संपदा थिटे यांनी केले होते. शुभदा आठवले (संवादिनी), ओंकार पाटणकर (सिंथेसायझर), सचिन इंगळे (पखवाज), प्रवीण ढवळे, योगीराज राजहंस, गंधार ढवळे (तालवाद्य), मंगेश राजहंस (तबला) यांनी साथसंगत केली.

संपदा थिटे, लीना परगी, डॉ. सावनी परगी, डॉ. प्राची पांडे, प्राची गुप्ते, चांदणी पांडे, धनश्री शिंदे, निधी पारेख, ऋतुजा शेलार, प्रणव केसकर, विराज सवाई, अंकुर शुक्ल आणि विनायक लिमये यांनी गायन केले.

डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. रवी मेघावत आणि केदार अभ्यंकर यांनी ध्वनी संयोजन केले. गजानन वाटाणे आणि विनायक काळे यांनी प्रकाश योजना केली होती. सृजनच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.