Pune : ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम काही नेत्यांना प्रमोट करण्याचा जूमला; सुप्रिया सुळे यांचा सरकारला टोला

एमपीसी न्यूज : राज्य सरकार मार्फत अनेक (Pune) भागात शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमावर कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. तसेच एसटीचा ताफा कार्यक्रमांच्या ठिकाणी आणला जात आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 

त्या म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकाच्या पैशांमधून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम केवळ व्यासपीठावरील नेत्यांना प्रमोट करण्याचा केविलवाणा प्रकार आहे. तर या राज्य सरकारने नवीन जूमला या कार्यक्रमाच्या माध्यमातुतून सुरू केला आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.

Bhosari : बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल; कंपनी, मालक ठेकेदाराविरोधात गुन्हा

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात गृहमंत्री अपयशी- सुप्रिया सुळे

देशातील मणिपूर, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा (Pune) प्रश्न गंभीर झाला असून याकडे केंद्र सरकार गांभीर्याने पाहत नाही. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकरात लवकर योग्य पावलं उचलण्याची गरज आहे.

त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ट्विटद्वारे मागणी केली आहे. तर इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातील महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या घटना सतत घडत आहे. त्यावर गृह विभागामार्फत उपाय योजना केल्या पाहिजेत. मात्र त्यामध्ये गृह विभाग अपयशी ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.