Bhosari : बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल; कंपनी, मालक ठेकेदाराविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी येथील (Bhosari) एफ – दोन ब्लॉकमध्ये विनापरवाना झाडांची कत्तल करणाऱ्या कंपनी, मालकसह ठेकेदाराविरोधात महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.16) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

कंपनी मालक सुरेश जे बजाज आणि ठेकेदार राजेंद्र बाबू मांजरे यांच्याविरोधात झाडांचे संरक्षण व जतन या अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महापालिकेचे उद्यान सहाय्यक सुहास एकनाथ सामसे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमआयडीसीत विनापरवाना झाडे तोडली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्यान विभागाचे अधिकारी तिथे पोहोचले. त्यावेळी कंपनीतील आणि फुटपाथवरील महापालिका मालकीची मोहोगणीची चार, कांचन, कोशिया, रेन्ट्री आणि आंब्याचे प्रत्येकी एक झाड जमिनीपासून तोडले होते.

लाकडे टेम्पोमध्ये भरून घेवून जात असताना महापालिका अधिकाऱ्यांनी टेम्पो अडविला. झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याचे समोर आले. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Talegaon : जबाबदार आणि हुशार नागरिकांमुळे आपला देश प्रगतीपथावर – नंदकुमार शेलार

दरम्यान, शहरात सातत्याने (Bhosari) बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल केली जात आहे. एक झाडे तोडण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडली जात आहेत. झाडे तोडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.