Pune Theft: झारखंडच्या चोरट्यांकडून दिड कोटींचे मोबाईल व लॅपटॉप जप्त

एमपीसी न्यूज : पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या झारखंड येथील चोरट्यांकडून पोलिसांनी दिडकोटी रुपयांचे महागडे मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहेत. (Pune Theft) ही करावाई लोणीकंद पोलिसांनी सोमवारी (दि.25) केली आहे.

 

यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अब्दुल हाय अबुजार शेख (वय 20 रा.चाकण) व अबेदुर मुफजुल शेख (वय 34) अशी अटक आरोपींची नावे असून सुलतान अब्दुल शेख (वय 32), अबुबकर अबुअजार शेख (वय 23), राबीबुल मुंटू शेख (वय 22) हे तिघे फरार झाले आहेत. हे सर्व चाकण येथे रहात असून ते मुळचे झारखंड येथील रहिवासी आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिसांना खबर मिळाली की, लोणीकंद ते केसनंद रोडवर खंडोबा माळाचे इथे पाच ते सहा लोक एखादा ट्रक किंवा पेट्रोल पंपवर दरोडा टाकण्याचा तयारीत आहेत. (Pune Theft) त्यांच्याकडे घातक शस्त्र असल्याची पक्की माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले तर तीघेजण पळून गेले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पक्कड, कोयता, दोरी असा सात हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

PMPML : बाजीराव व शिवाजी रोडवरील पीएमपीएमएलच्या मार्गिकेत उद्यापासून बदल

 

यावेळी अटक आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी प्रो कनेक्ट सप्लाय चेन सोल्यूशन लिमीटेड कंपनीच्या गोडाऊनवरच 24 जुलै रोजी दरोडा टाकल्याचे सांगितले. (Pune Theft) यामधघ्ये आरोपींनी तब्बल एक कोटी 53 लाख 98 हजार 100 रुपयांचे अपल किंमतीचे 197 मोबाईल, 3 लॅपटॉप, 7 आयपॅड व इतर सामान चोरले होते. ते पोलिसांनी जप्त केले.याचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.