Pune : चोरट्यांचा औंध परिसरात हैदोस; महिनाभरात 17 दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

Theft reported in 17 shops in a month in Aundh area : चोरट्यांचा औंध परिसरात हैदोस; महिनाभरात 17 दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

एमपीसीन्यूज : लॉकडाऊन संपल्यानंतर चोरटे चांगलेच सक्रिय झाले असून त्यांनी मागील महिनाभरात चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औंध परिसरातील सतरा दुकाने फोडली. या दुकानातून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ही सर्व दुकाने पाषाण, बाणेर, औंध परिसरातील आहेत. चोरीच्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी मागील दोन दिवसांमध्ये एकट्या बाणेरमधील चार दुकाने फोडली. याप्रकरणी अनिल अग्रवाल या दुकान मालकाने चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पाषाणमध्ये त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर चोरटयांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील 15 हजारांची रोकड चोरुन नेली.

याचरम्यान चोरट्यांनी बाणेर परिसरातील तीन सुपर मार्केट दुकानेही फोडण्याचा प्रयत्न केला. महिनाभरात या परिसरातील एकूण 17  दुकाने फोडून चोरटयांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.

काही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परीहार चौकातील चार ते पाच दुकाने फोडली होती. सातत्याने होणार्‍या चोरीच्या घटनांमुळे या परिसरातील छोटे व्यापारी हैराण झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like