Pune : एटीएममधून 60 हजार रूपये पळवणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- एटीएम मशीनच्या बटनांशी छेडछाड करून मशीन मधील तब्बल 60 हजार रुपयांची चोरी केल्या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल मंगळवारी (दि.23) रात्री पावणे अकराच्या दरम्यान कर्वेरोड येथील पेट्रोल पंपावरील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये घडली.

या प्रकरणी संजय नलवडे (वय 47, रा.बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. देवकरण दीपचंद प्रजापती (वय 27, रा. हरियाणा) व सर्फराज उमर मोहमद (वय 26, रा. हरियाणा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कर्वेरोड येथील रांका ज्वेलर्सजवळ असलेल्या एच. पी. पेट्रोल पंपावरील स्टेट बँकेच्या एमटीएम च्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आरोपींनी एमटीएममध्ये प्रवेश केला व तेथील एटीएम मशीनच्या बटनांशी छेडछाड करून मशीन मधील तब्बल 60 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.