Pune : पुण्यातील कोंढवा भागात बस ने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

दोन जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज-पुण्यातील कोंढवा ( Pune) भागातील एनआयबीएम रोडवर खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने 5 ते 6 वाहनांना दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून घटनास्थळी कोंढवा पोलीस दाखल झाले आहेत.

Pune : दिएगो ज्युनियर्स व दुर्गा एसएने पटकावले ॲस्पायर चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रोडजवळील इशरत बाग जवळील चढावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याची घटना घडली.त्यामुळे बस रिव्हर्स आल्याने 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक दिली.तर या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तसेच मृतांची नावे समजू शकली नाही. अधिक तपास सुरू ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.