Pune : पाण्यासाठी उरुळी देवाची ग्रामस्थांचे आंदोलन; महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन केला निषेध

Uruli Deva villagers' agitation for water; The women protested with pots on their heads :पाण्यासाठी दिला 8 दिवसांचा अल्टिमेटम

एमपीसीन्यूज : ऐ ग्रेड महापालिका हद्दीत असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची ग्रामस्थांची झाली आहे. पाण्यासाठी पत्रे लिहिली, निवेदने दिली, आक्रोश मांडला, प्रसार माध्यमांनी दखल घेतली पण महापालिकेला अजुनही जाग येईना. त्यामुळे ग्रामस्थांनी शुक्रवारी एकत्र येत काळी फित लावून पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त केला. यावेळी महिला मोठ्या संख्येने आपआपल्या घरासमोर आणि चौका चौकात एकत्र येऊन डोक्यावर हंडा घेऊन निषेध व्यक्त केला.

आंदोलनाचे नेतृत्व माजी उपसरपंच व भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले.

यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब नेवसे, जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक तांगडे , अक्षय नेवसे, पद्मावती सिंगाडे, नीलम नमळे, भारती धर्माधिकारी, रुपाली तांगडे, जया नेवसे, अल्का बहुले, जाईबाई बहुले, पोर्णिमा बहुले, बोलेनाथ भाडळे, संदीप ढेरंगे, दिलीप मोरे, अनिल आदमाने, मिथुन शिळीमकर, आबा अडसूळ, प्रतिक बहुले आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण केले मात्र, अद्यापही पाणी सुरू झालेले नाही.

मंतरवाडीत पाणी येते. परंतु, उरुळीत पाणी नाही, अशी येथील अवस्था आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइनने पाणी सुरू करावी, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी केली होती.

मात्र, या मागणीची कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे आजचे आंदोलन करण्यात आले.

येत्या आठ दिवसात बंद नलीकेद्वारे पाणी गावाला सुरु करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उरुळी देवाची ग्रामस्थांनी दिला आहे.
या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.