Pune : उषा वाजपेयी ‘ह्यूमन अचिव्हर्स फाउंडेशन अवॉर्ड 2019’ ने सन्मानित

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय संयोजिका (महिलामोर्चा भाजपा) उषा वाजपेयी यांना ‘ह्यूमन अचिव्हर्स फाउंडेशन अवॉर्ड 2019’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ‘ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजिन’च्या वतीने हा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम ‘घाना एम्बेसी, दिल्ली येथे नुकताच झाला. महिला सबलीकरण कार्यात उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

उषा वाजपेयी या शिक्षण व माध्यम संशोधन केंद्रा (ईएमआरसी) पुणे विद्यापीठ येथे माध्यम संशोधक होत्या. ‘कलाकृती’ च्या बॅनरखाली हस्तकला उद्योग करून इच्छुक महिलांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी उत्तम व्यासपीठ म्हणून कार्य करत आहेत. के सी एल ए. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेली 20 वर्षे त्या महिला सशक्तीकरणासाठी काम करतात. महिलांना त्यांच्या हक्कांसाठी उभे राहण्यास आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी शिक्षित करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय महिला मोर्चा, भाजपाच्या राष्ट्रीय संयोजिका पदावर त्या कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.