Chinchwad : एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये हेवन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- फिटयुथ पेन इंडिया आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील एरोबिक्स डान्स व एरोबिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये 11 वर्षातील वयोगटात हेवन स्पोर्टस क्लबचा खेळाडू अद्वैत खांबेटे याने तिसरा क्रमांक तर परीजा क्षीरसागर हिने चौथा क्रमांक पटकावला आहे. गोवा येथे 12 ते 14 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडली.

११ वर्षातील वैयक्तिक पुरूष गटात 12 स्पर्धकांमध्ये अद्वैत खांबेटे याने 14.35 गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला तर वैयक्तिक महिला गटात परीजा क्षीरसागर हिने 39 स्पर्धकांमध्ये चौथा क्रमांक राखला. मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये अद्वैत 5 व्या स्थानावर होता तर परीजा हिची यंदाची पहिलीच स्पर्धा होती.

हेवनची पूर्व खेळाडू व प्रशिक्षक क्षितिजा राऊत प्रशिक्षक म्हणुन काम पहिले. संस्थेचे प्रशिक्षक व संस्थापक अलका तापकीर,चैतन्य कुलकर्णी, हर्षद कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड संघटनेचे अध्यक्ष संजय मंगोडेकर व इतर अधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.