Pune Vaccination News : शहरात आता पर्यंत टोचले 11 लाख 22 हजार कोरोना लसीचे डोस

एमपीसी न्यूज – शहरात कोरोना लसीकरण मोहिमे अंतर्गत 16 मार्च पासून 3 जून पर्यंत 11 लाख 22हजार 811 लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यात 8 लाख 61 हजार 176 जणांचा पहिला डोस झाला असून 2 लाख 61 हजार 625 जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

शहरात 16 मार्च पासून कोरोनाचे प्रतिबंधीत लसीकरण सुरु झाले. यामध्ये सर्वप्रथम शासकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारी पासून फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले तर 1 मार्च रोजी 65 वर्षांवरील नागरिकांचे त्यानंतर 1 एप्रील पासून 45 वर्षांपुढील नागरिकांचे आणि 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले.

सध्या शहरात 240 लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये 141 शासकीय, 82 खासगी, सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत चालणारे शासकीय 5 आणि खासगी कामांच्या ठिकाणी 12 लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रामधून 16 मार्च ते 3 जूनपर्यंत 11 लाख 22 हजार 811 लसींचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 60 हजार 415 शासकीय व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर 46 हजार 388 कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्करमधील 72 हजार 86 नागरिकांचा पहिला तर 25 हजार 902 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

याशिवाय 60 वर्षावरील 2 लाख 87 हजार 943 नागरिकांचा पहिला तर 1 लाख 32 हजार 527 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. 45 ते 59 वयोगटातील 3 लाख 10 हजार 973 नागरिकांचा पहिला तर 54 हजार 648 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झला आहे. तसेच 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 29 हजार 769 जणांचा पहिला तर 2 हजार 160 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.