Pune vehicle theft : झटपट पैसे मिळवण्याच्या नादात करू लागला चोरी; संगीतात एक्सपर्ट असणारा तुरुंगात

एमपीसी न्यूज : पोलिसांनी एका अशा वाहन चोराला अटक केले तो संगीत कलेत एक्सपर्ट होता. त्याने संगीत कलेची पदवी मिळवली होती आणि त्याला संगीतामध्ये पीएचडी करायची होती.(Pune vehicle theft)मात्र झटपट पैसे मिळवण्याचा नाद आणि वाईट संगतीचा परिणाम असा झाला की आता त्याला तुरुंगात जावे लागले. पुणे पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तीन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या वाहन चोर विरोधी पथकाला हडपसर परिसरात एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनीच आपण संगीतात एक्सपर्ट असल्याचे सांगितले.

Kalapini Talegaon : कै. पद्माकर प्रधान स्मृती पुष्प सुगम संगीत स्पर्धा 2022 उत्साहात संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरमालकाला वडील लष्करात असल्याचे आणि बहीण कॅनडाला असल्याचे खोटे सांगितले होते. तसेच आपणही लवकरच कॅनडाला जाणार असल्याचे सांगितले.(Pune vehicle theft)असे सांगून त्याने घरमालकाचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात ग्रुप प्रसाद हा नगर जिल्ह्यातील राहुरीचा आहे. आई-वडील शेतकरी आहेत. तो पुण्यात एकटाच राहतो.

गुरुप्रसाद हा संगीत विशारद आहे. त्याने संगीतात पदवीही मिळवली आहे. तो भजनही गात असल्याने त्याला मानसन्मानही मिळत होता. तर अनेक ठिकाणी तो गायन आणि वादन करण्यासाठी ही जात होता.(Pune vehicle theft) मात्र झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने चोरी करण्यास सुरुवात केली आणि अखेर तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.