Chakan annual meeting : चाकण पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

एमपीसी न्यूज : चाकण नागरी सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अशोक गोरे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण ( ता. खेड) येथील मिरा मंगल कार्यालयात सोमवारी (दि. 26 )  खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

संस्थेच्या संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे 15 टक्के लाभांश या सभेत जाहीर करण्यात आला. सभासदांनी अहवाल ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचुन कायम केले. तसेच शासकीय लेखापरीक्षक यांचा अहवाल वाचन केले.  संस्थेस ऑडीट वर्ग ‘अ’ प्राप्त झाल्यामुळे आजी माजी संचालक मंडळ आणि सभासदांनी समाधान व्यक्त केले. सभासदांना वसुली बाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Chandrakant Patil : विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे –  चंद्रकांत पाटील

या सभेस संस्थेचे अध्यक्ष अशोक गोरे, उपाध्यक्ष सुरेश कांडगे, संचालक नितीन गोरे, प्रकाश भुजबळ, रोहन कांडगे, अनिल जगनाडे, नंदकुमार गोरे, संजय वाडेकर, नवनाथ शेवकरी, शांताबाई गोरे, मनीषा जाधव, राहुल परदेशी, तद्न्य संचालक भगवान कांडगे, अंकुश पवार संस्थेचे माजी सर्व संचालक, (Chakan annual meeting) सभासद  उपस्थित होते. दिपप्रज्वलन व संस्थेचे संस्थापक स्व. गुलाबराव गोरे, मा. आ. स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचे प्रतिमा पुजन करून सभेस सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सचिव अनिल धाडगे यांनी केले. संचालक नितीन गोरे यांनी संस्थेच्या उल्लेखनीय कार्याच्या संदर्भातील माहिती सभासदांना दिली.

संस्थेचे संचालक नितीन गोरे यांची महा. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सभासदांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. (Chakan annual meeting) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्याकडून राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार संस्थेस मिळाल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.  स्व. आ. सुरेश गोरे यांच्या स्मरणार्थ गौरव पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आले.  डॉ. अविनाश अरगडे, ज्योती गरुड, सुन्नाअप्पा सिकीलकर, पांडुरंग गोरे यांना हे पुरस्कार देण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.