BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यांवर भरतनाट्यमद्वारे जनजागृती

'अनिता नेवे नृत्यपूजा अॅकेडमी 'चा अभिनव उपक्रम

29
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- होळीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी पुण्याच्या नाक्यांवर भरतनाट्यमद्वारे जनजागृती करणारा ‘अनिता नेवे नृत्यपूजा एकेडमी ‘ तर्फे ‘जल होश ‘ हा अभिनव उपक्रम 16, 17 मार्च रोजी पुण्यातील नाक्यानाक्यावर आयोजन करण्यात आला आहे. होळीचा सण २० मार्च रोजी असल्याने त्यापूर्वी ही जनजागृती पुणेकरांमध्ये केली जाणार आहे, अशी माहिती अॅकेडमीच्या संचालक अनिता नेवे यांनी पत्रकाद्वारे दिली.

पुण्यातील ‘अनिता नेवे नृत्यपूजा अॅकेडमी ‘ ने 16, 17  मार्च रोजी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर ,नाक्यांवर प्रथमच आयोजित केला आहे. युवा कलाकारांद्वारे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण केले जाणार आहे. तसेच पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी होऊन पाणी बचतीचे आवाहन करणार आहेत. सावित्राबाई फुले विद्यापीठ ,जंगलीमहाराज रस्ता, फर्गसन रस्ता, कोथरूड, शनिवारवाडा, कल्याणीनगर, खराडी, विमाननगर या ठिकाणी हे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण होणार आहे.

खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार जगदीश मुळीक, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, अजित कुमठेकर,अर्जुन जगताप, मुक्ता जगताप, आनंद सराफ तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या अभिनव उपक्रमात सहभागी होणार आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3