Pune : पुणे शहर काँग्रेसची उमेदवारी आमचीच, एकाच जागेवर तिघांचा दावा

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानतंर पुणे लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेले संजय काकडे, मोहन जोशी, प्रविण गायकवाड यांनी काँग्रेस आपल्याच तिकिट देणार असल्याचे तिघानीही ठामपणे सांगितले.

पुण्यात वैशाली हाँटेल येथे पुणेरी कट्टा दरम्यान काँग्रेसचे नेते मोहन जोशी, खासदार संजय काकडे, प्रविण गायकवाड, आमदार निलम गो-हे, भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

  • दरम्यान काँग्रेसमध्ये मी लवकरच प्रवेश करणार असुन पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार असल्याचे संजय काकडे यांनी सांंगितले.

प्रविण गायकवाड यांनीही मी काँग्रेसकडुन इच्छुक असुन याबद्दल वरिष्ठाशी चर्चा झाल्याचे सांगत पक्ष मला उमेदवारी देईल असा विश्वासही त्यांनी व्यकत केला आहे.

  • तर दुसरीकडे पक्षनिष्ठेला जागणारे मोहन जोशी यांनी मात्र काँग्रेस निष्ठा समोर ठेऊन मलाच तिकीट देईल. असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे नक्की काँग्रेस तिकीट देणार कोणाला हे लवकरच कळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.