Pune : राज्यस्तरीय महिला विशेष संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच, महाराष्ट्र यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत “एक दिवस तिच्यासाठी” या संकल्पने अंतर्गत पुण्यात राज्यस्तरीय महिला विशेष संमेलन व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी कवयित्री अंजली कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेत्री जयमाला इनामदार, स्त्री अभ्यासक क्रांती पैठणकर, कविता मोरवणकर, रमणी बबिता आकाश,पद्मा निकम, शोभा कारंडे, स्नेहाराणी गायकवाड, विमल माळी, शारदा गायकवाड, रजनी पाटील, रजनी निकाळजे, संध्या गोळे, ज्येष्ठ कवयित्री रजनी अहेरराव, माधुरी विधाटे, वर्षा बालगोपाल, समृद्धी सुर्वे, मधुश्री ऒव्हाळ, संगीता झिंझुरके, मानसी चिटणीस, मृण्मयी नारद, शिल्पा कुलकर्णी, मेधा देसाई, श्यामला पंडीत, कवी आकाश अप्पा सोनवणे, चित्रपट अभिनेते मकरंद कुलकर्णी, बेळगाव येथील शब्दविद्या चे जिल्हाप्रमुख भरमा कोळेकर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजलकार रघुनाथ पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून स्वाती पाटील यांनी गायलेल्या “साऊ पेटती मशाल” या गीताने कार्यक्रमाचे उदघाटन झाले, त्यानंतर प्रसिद्ध नृत्यकार व नृत्यदिग्दर्शक फिरोज मुजावर यांनी स्त्री वेशात “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी युवा सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बामणे, युवा सामाजिक कार्यकर्ते लहू मारुती भुरुक यांना “शब्दविद्या समाजगौरव विशेष सन्मान २०१९” ने गौरवण्यात आले. तर प्रकाशक व कवयित्री रूपाली अवचरे आणि बालकवयित्री संस्कृती वाबळे याना “शब्दविद्या साहित्य गौरव विशेष सन्मान २०१९” ने सन्मानित करण्यात आले. युवा नेतृत्व सम्राट गोरखे यांचाही सन्मान करण्यात आला.

“बहिणाबाईची गाणी” हा संजीवनी राजगुरू यांची संकल्पना दिग्दर्शन असलेला बहिणाबाई यांच्या कवितांवर आधारित प्रयोगात निवेदिका सुवर्णा जाधव, संजीवनी राजगुरू, छाया कोरेगावकर, राजश्री कांबळे, श्रद्धा खानापूरकर यांनी भाग घेतला.

आयोजन शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंचचे संस्थापक हृदयमानव अशोक, अध्यक्ष ऋषिकेश सूर्यवंशी, तसेच प्रसिद्ध कवयित्री संजीवनी राजगुरू, समृद्धी सुर्वे, सायराबानू चौगुले, स्वाती पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रियांका ठोंबरे यांनी तर आभार हृदयमानव अशोक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.