Pune : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलेचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहीरीत टाकला 

एमपीसी न्यूज- पुण्यात सोमवारी खुनाच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील खडकी आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही खुनाची घटना उघडकीस आली आहे.मांजरी बुद्रुक परिसरात शेतमजूर महिलेचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्यानंतर तिचा (Pune) मृतदेह विहीरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उषा अशोक देशमुख (वय 50 , रा. कवडीपाट) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्नेहल काळभोर (वय 50 ) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला.

 

Pimpri : व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी पहिल्या सामन्याचे विजयी

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत उषा या लोणी काळभोरमधील कवडीपाट येथील आहेत. त्या शेतमजूरी करत होत्या. सोमवारी त्या तक्रारदार स्नेहल काळभोर यांच्या शेतात कामानिमित्त आल्या होत्या. परंतु, दुपारनंतर त्या अचानक गायब झाल्या. दरम्यान, तक्रारदारांनी सायंकाळी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह विहीरीत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वाकरून त्यांचा खून केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस करत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.